Homeशैक्षणिक - उद्योग साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे मूल्यवर्धन गरजेचे : विश्वजित शिंदे

साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे मूल्यवर्धन गरजेचे : विश्वजित शिंदे

• डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘साखर उद्योगातील उपपदार्थ व शाश्वतता’ कार्यशाळा
कोल्हापूर :
साखर कारखानदारीचा समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणावर मोठा प्रभाव असून हा उद्योग ग्रामीण विकासाचा कणा आहे. साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे मूल्यवर्धन अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कराडचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित शिंदे यांनी केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साखर उद्योगातील उपपदार्थ व शाश्वतता’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत विश्वजित शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा होते.
शिंदे पुढे म्हणाले की, शेतकरी, ग्राहक आणि शासन यांच्यात समतोल राखणे हे मोठे आव्हान असून उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी उपपदार्थांचे मूल्यवर्धन अत्यावश्यक आहे. इथेनॉलसारख्या ऊर्जा निर्मिती करणाऱ्या उत्पादनांमुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होत असून चक्रीय र्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या संकल्पना स्वीकारणे ही काळाची गरज आहे.
स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यशाळेच्या उद्दिष्टांची माहिती दिली. स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी स्वागत केले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28.9 °
28 °
78 %
5.1kmh
41 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page