Homeइतर५ सप्टेंबरला युवाशक्ती दहीहंडीचा थरार

५ सप्टेंबरला युवाशक्ती दहीहंडीचा थरार

• प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ३ लाखांचे बक्षीस
• ५ थरांपासून ते ८ थरांची सलामी देणार्‍या संघांना आकर्षक बक्षिसे
कोल्हापूर :
ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ३ लाख रुपयांचे बक्षीस तसेच ५ थरांपासून ते ८ थरांची सलामी देणार्‍या संघांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले की, स्पर्धेच्या उदघाटनाला मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, खा. धैर्यशील माने, आ. विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके, आ. राहूल आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
यंदाही युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. तर स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक गोविंदा पथकाला, प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. पहिल्याच प्रयत्नात पाच थर लावून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला प्रोत्साहन म्हणून ५ हजार रूपये दिले जातील. तर सहा थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला १० हजार रूपये आणि सात थर रचून सलामी देणार्‍या गोविंदा पथकाला १५ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तर ८ थर लावणार्‍या गोविंदा पथकाला १ लाख रूपयांचं बक्षिस दिले जाणार आहे. शिवाय भागीरथी महिला संस्थेकडून सर्व गोविंदा पथकांसाठी फुड पॅकेट वितरीत केले जाणार आहे.
दहीहंडी फोडणारा सर्वात वरच्या थरावरील गोविंदा १४ वर्षावरील असावा, या नियमाचे काटेकोर पालन केले जाईल. तर सर्व गोविंदांना १० लाख रूपयांपर्यंतचे अपघाती विमा कवच असणार आहे. युवाशक्ती दहीहंडीच्या निमित्ताने छायाचित्रण स्पर्धाही आयोजित केली आहे. तसेच युवाशक्ती दहीहंडी रिल्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या क्रीडापटूंचा सत्कार होणार आहे.
पत्रकार परिषदेला चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, नगरसेवक वैभव कुंभार, प्रमोद पाटील, विनोद कांबोज, सागर बगाडे, उत्तम पाटील, विजय टिपुगडे, राजेंद्र बनसोडे, झाकीर जमादार, उदय चव्हाण, उमेश पाटील, अमित पालोजी, विनायक सुतार उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29 ° C
29 °
29 °
74 %
3.6kmh
35 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page