कोल्हापूर :
सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यासोबतच ११ महिन्यांची नियुक्ती मिळणे, मूळ वेतन, रजा आणि सेवास्थैर्य यांसह विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी सांगितले.
कौस्तुभ गावडे यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान विविध शैक्षणिक संस्थाना भेटी देत, प्राध्यापक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी प्राध्यापक आणि शिक्षकांनी त्यांच्या समस्या आणि अडचणी श्री. गावडे यांच्याकडे मांडल्या.
कौस्तुभ गावडे म्हणाले की, राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना मानधनातील मर्यादा, नियुक्तीतील अनिश्चितता आणि सेवाविषयक सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागतो. अनेक वर्षे अध्यापन करूनही त्यांच्या सेवेला स्थैर्य मिळत नसल्याने आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्यांबाबत धोरणात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
सीएचबी प्राध्यापकांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून ११ महिन्यांची नियुक्ती मिळावी, यासाठी मुलाखतींची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र प्राध्यापकांना ॲड-हॉक पूर्णवेळ नियुक्ती आणि मूळ वेतन देण्याबाबतही शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
——————————
सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार : कौस्तुभ गावडे
Mumbai
haze
27
°
C
27
°
27
°
61 %
2.1kmh
95 %
Thu
28
°
Fri
30
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°

