Homeसण - उत्सवआर्ट ऑफ लिव्हिंग कोल्हापूरतर्फे उद्यापासून शारदीय नवरात्रौत्सव

आर्ट ऑफ लिव्हिंग कोल्हापूरतर्फे उद्यापासून शारदीय नवरात्रौत्सव

कोल्हापूर :
श्री श्री रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिव्हिंगची संलग्र संस्था वैदिक धर्म संस्थान, कोल्हापूर च्यावतीने दि. १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आयर्विन मल्टीपर्पज हॉल, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ब्रम्हचारी पुण्यश्लोक आणि समन्वयकांनी दिली.
आर्ट ऑफ लिव्हिंगची संलग्र संस्था वैदिक धर्म संस्थान, कोल्हापूरतर्फे गेल्या १९ वर्षापासून शारदीय नवरात्रौत्सव आयोजित केला जातो. नवरात्रौत्सवामध्ये महाचंडी होम सह विविध होम, पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येतात. हे सर्व होम आणि विधी ब्रह्मचारी पुण्यश्लोक जी यांच्या उपस्थितीत होत आहेत. बेंगळूरूस्थित वेद विज्ञान महाविद्यापीठमधील प्रशिक्षित पंडित आणि सहकारी हे विधी करणार आहेत.
शुक्रवारी (दि.१६) सकाळी ८:३० वाजता श्री महा गणपती होमापासून सुरवात होऊन श्री, वास्तू होम आणि नवग्रह होम होतील. सायंकाळी ६ वाजता महा सुदर्शन होम होईल. सुदर्शन होमामध्ये साधक सुदर्शन क्रिया करतात. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
शनिवारी (दि. १७) सकाळी ८:३० वाजता रुद्र पूजा आणि रुद्र होम तसेच सायंकाळी ६ वाजता महा चंडी कलश स्थापना आणि चंडी पारायण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
रविवारी (दि. १८) सकाळी ७:३० वाजता महा चंडी होम होईल. यामध्ये गो पूजा, अश्व पूजा, कन्या पूजन, सुहासिनी पूजन आणि दांपत्य पूजन असते.
याप्रसंगी दैनंदिक सत्संग होणार असून महाप्रसादाची सोय आहे. हे सर्व होम आणि विधी सर्वांसाठी खुले असून सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ब्रम्हचारी पुण्यश्लोक जी, समन्वयक राहुल नागवेकर, समीर बखले, अजय किल्लेदार, मानसिंग जाधव, हेमंत माळी, सचिन लाड, डिंपल  गजवानी, मंदिर चव्हाण, सचिन पाटील यांनी केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
28.6 ° C
28.6 °
28.6 °
68 %
3kmh
16 %
Wed
29 °
Thu
31 °
Fri
30 °
Sat
29 °
Sun
31 °

Most Popular

You cannot copy content of this page