Homeसण - उत्सवअश्विन शुद्ध प्रतिपदेला अंबाबाईची 'नंदादेवी' रूपात पूजा

अश्विन शुद्ध प्रतिपदेला अंबाबाईची ‘नंदादेवी’ रूपात पूजा

कोल्हापूर :
शारदीय नवरात्रौत्सवास आजपासून प्रारंभ झाला. अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात नवरात्राच्या पहिल्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची ‘नंदादेवी’ रूपात पूजा बांधण्यात आली. ही सालंकृत पूजा पाहण्यासाठी आणि देवीची दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी मंदिरात सकाळी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना झाली. त्यानंतर दुपारी देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली. नवरात्रौत्सवात देवीची दररोज विविध रुपांत आकर्षक अशी सालंकृत पूजा बांधण्यात येते. ही पूजा पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. अश्विन शुद्ध प्रतिपदा तिथीला श्री अंबाबाईची ‘नंदादेवी’ रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा अजिंक्य मुनिश्वर, वेदांग मुनिश्वर, सोहम दिलीप मुनिश्वर, रवी माईणकर यांनी बांधली.
नंदादेवीचे स्वरूप वर्णन असे आहे.
देवीमाहात्म्य अंतर्गत मूर्तीरहस्यामध्ये नंदा देवीचे स्वरूप वर्णन केलेले आहे. त्यानुसार नंदा देवी ही सोन्यासारखी कांती असलेली, सुवर्णमय वस्त्रे व आभूषणे धारण केलेली आहे. ती चतुर्भुज असून तिच्या चार हातांत कमळ, अंकुश, पाश आणि शंख आहेत.
या देवीची नंदजा, कमला, इंदिरा, श्री आणि लक्ष्मी अशी इतर नावे आहेत. मूर्तीरहस्यानुसार या देवीची स्तुती, पूजन व ध्यान केल्याने तीनही लोक वश होतात.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28.5 ° C
28.5 °
28.5 °
67 %
3kmh
41 %
Sun
28 °
Mon
32 °
Tue
31 °
Wed
31 °
Thu
31 °

Most Popular

You cannot copy content of this page