Homeकला - क्रीडाखेलो इंडिया उपक्रमा अंतर्गत कोल्हापूरात होणार १३ वर्षाखालील मुली-अस्मिता सिटी लिग स्पर्धा

खेलो इंडिया उपक्रमा अंतर्गत कोल्हापूरात होणार १३ वर्षाखालील मुली-अस्मिता सिटी लिग स्पर्धा

• केएसएच्यावतीने दि. २६ व २७ नोव्हेंबरला फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर :
भारत सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय खेलो इंडिया उपक्रमा अंतर्गत भारतातील विविध राज्यांमध्ये १३ वर्षाखालील मुलींकरिता अस्मिता सिटी लिग फुटबॉल स्पर्धांचे आयोजन होत आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर शहरात या स्पर्धेचे आयोजन दि. २६ व २७ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती शाहू स्टेडियम किंवा पोलो ग्राऊंड येथे होणार आहे.
महिलांच्या क्रीडा सहभागाला प्रोत्साहन देणेसाठी ही स्पर्धा आहे. अस्मिता – ASMITA चे पूर्ण नांव Achieving Sports Milestone by Inspiring Women Through Action असे आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुली व महिलांना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, खेळाडूंना स्पर्धेचा अनुभव, त्यांच्यातील क्रीडा कौशल्य ओळखणे आणि त्यांना उच्चस्तरीय स्पर्धांसाठी प्रोत्साहीत करणे हा आहे.
ही स्पर्धा ऑल इडिया फुटबॉल फेडरेशनच्या सेंट्रलाईज्ड मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत घेणेत येणार आहे. याकरिता या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कोल्हापूर शहरातील १३ वर्षाखालील मुलींच्या संघांनी प्रथमतः आपल्या संघाची व खेळाडूंची नोंदणी AIFF CRS PORTAL व KHELO INDIA NSRS PORTAL येथे Digi Locker Verification सह करणे आवश्यक आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या मुली व ज्यांचा जन्म सन २०१४-१५ मधील आहे, त्याच खेळाडू मुली या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. संघामध्ये कमीत-कमी १६ खेळाडूंची व जास्तीत-जास्त २० खेळाडूंची नोंदणी करावी.
ऑल इंडिया फुटबॉल फेड्रेशन, न्यू दिल्ली यांच्यावतीने संघ व खेळाडू यांच्या नोंदणीसाठी सेंट्रलाईज्ड रजिस्ट्रेशन सिस्टीम ऑनलाईन पोर्टल सुरू आहे. तसेच भारत सरकारच्या वतीने KHELO INDIA NSRS PORTAL – Athlete Registration या ऑनलाईन पोर्टल अंतर्गत १३ वर्षाखालील मुली यांच्या फुटबॉल संघाची व खेळाडूंची नांव नोंदणी दि. ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत करावी. या पोर्टल अंतर्गत नोंदणी असणारे संघ व खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र राहतील.
इच्छूक संघांनी दि. १४-१०-२०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता केे.एस.ए. कार्यालयात मिटींगसाठी उपस्थित राहावे, असे केएसएचे ऑन.जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29.3 ° C
29.3 °
29.3 °
64 %
2.5kmh
100 %
Sat
29 °
Sun
31 °
Mon
31 °
Tue
31 °
Wed
31 °

Most Popular

You cannot copy content of this page