Homeकला - क्रीडाकोल्हापूरचे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करतील

कोल्हापूरचे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करतील

• प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते आंतरविभागीय हॉकी स्पर्धेचे उदघाटन
कोल्हापूर :
कोल्हापूरचे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत ऑलिंपिकपर्यंत नक्कीच मजल मारतील, असा विश्वास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केला. ते शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय पुरुष हॉकी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय पुरुष हॉकी स्पर्धेचे उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेत एकूण पाच संघांनी सहभाग नोंदवला आहे.
उदघाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे उपस्थित होते. यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा समृद्ध वारसा जपणाऱ्या या ऐतिहासिक क्रीडानगरीत हॉकीच्या पारंपरिक संस्कृतीला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मोठी जोड मिळाली आहे. नवे ॲस्ट्रोटर्फ मैदान, शास्त्रोक्त प्रशिक्षण आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने कोल्हापूरचे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत ऑलिंपिकपर्यंत नक्कीच मजल मारतील. जुना वारसा आणि आधुनिक पद्धतींचा हा संगम नव्या पिढीतील खेळाडूंसाठी यशाची नवी दालने खुली करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. विकास जाधव काम पाहत असून, सदस्य म्हणून रणजीत इंगवले आणि संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी पंच म्हणून सागर जाधव, योगेश देशपांडे, संतोष चौगुले, सागर पोवाळकर, रमा पोतनीस, गणेश पाटील, ओंकार भांडवले, राहुल गावडे आणि राम पाटील जबाबदारी सांभाळत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. विकास जाधव यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. समीर पठाण यांनी करून दिली, तर प्रा. प्रशांत कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रशासकीय सेवक सुरेश चरापले यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विविध महाविद्यालयांतील शारीरिक शिक्षण संचालक, क्रीडा मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक आणि पालक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
28.9 °
51 %
3.6kmh
20 %
Tue
30 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
29 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page