कोल्हापूर :
प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे तथा सहायक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर, जिल्हा हिवताप कार्यालय कोल्हापूर यांच्या सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र घालवाड यांच्या सहकार्याने श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. दत्तनगर शिरोळ कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगारांचे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर झाले.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री दत्त आरोग्य केंद्र मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने शिबिरास सुरुवात केली. ऊसतोड मजुरांच्या खोपटावर जाऊन त्यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी करून प्राथमिक उपचार करण्यात आले.
याप्रसंगी आरोग्य सहाय्यक श्रीकांत निर्मळे, स्टाफ नर्स सौ. भाग्यश्री भोसले, आया सौ. प्रमिला गायकवाड व ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर सिकंदर सुतार यांचे सहकार्य लाभले.
——————————
श्री दत्त साखरच्यावतीने ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी
Mumbai
haze
26
°
C
26
°
26
°
61 %
0kmh
50 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
29
°

