कोल्हापूर :
हातावरचे पोट असलेली अनेक कुटुंबं, अडीचशे ते तीनशे मैलावरुन ऊस तोडीसाठी साखर कारखाना स्थळावर येतात. त्यांना सण-उत्सवाचा आनंद घेता येत नाही. अशा ऊस तोडणी कामगारांसोबत खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि भाजपच्या पदाधिकार्यांनी दिवाळीचा आनंद घेतला. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर राहणार्या २५० ऊसतोडणी मजुरांच्या कुटुंबांना साडी, कपडे, फराळ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून ऊस तोड मजुरांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न झाला.
बीड, उस्मानाबाद यासारख्या दुष्काळी जिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी मजुरांच्या टोळ्या साखर कारखाना स्थळांवर येतात. या मजुरांची परिस्थिती अतिशय हलाखीची असते. कारखान्याच्या परिसरातच पालाची झोपडी बांधून, हे ऊस तोडणी कामगार राहतात. ४ काठ्या बांधून उभारलेले स्नानगृह, झोपडीच्या दारात ३ दगडांची चूल आणि मुलांना झोपण्यासाठी झाडाला टांगलेला साडीचा झोपाळा अशा परिस्थितीत हे कुटुंबीय, ऊसतोड करत जगण्याची लढाई लढत असतात. या ऊस तोडणी मजुरांनाही दिवाळी साजरी करता यावी, यासाठी भारतीय जनता पार्टीने राज्यभर उपक्रम सुरू केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची सुरवात केली. त्यानंतर सोमवारी खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या पुढाकारातून, कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना स्थळावर राहणार्या ऊस तोड मजुरांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
खा. धनंजय महाडिक आणि आ. अमल महाडिक यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्यांनी ऊस तोड मजुरांच्या कुटुंबियांसोबत फराळाचा आनंद घेतला. त्यानंतर २५० कामगारांच्या कुटुंबांना साड्या, लहान मुलांना कपडे आणि मिठाई देऊन त्यांची दिवाळी गोड केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाजीराव चौगुले, धीरज उलपे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे, अशोक जाधव यांच्यासह डॉ. सदानंद राजवर्धन, कृष्णात उलपे, शरद बेडेकर, संजय जासूद, अमित टिकले, धीरज पाटील, राजाराम परीट, संजय पाटील, अभिषेक भोसले, किशोर पोवार, उमा पोवार, मकरंद बोराडे उपस्थित होते.
ऐन दिवाळीत नवे कपडे, फराळ आणि मिठाई मिळाल्याने ऊस तोडणी कामगारांचे कुटूंबिय खुश झाले. विशेषत: लहान मुलांच्या चेहर्यावरील आनंद आणि समाधान मानवतेची भावना अधोरेखित करणारे ठरले.
खा. धनंजय महाडिक आणि आ. अमल महाडिक यांची ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांसमवेत दिवाळी
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
1.5kmh
46 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
27
°

