कोल्हापूर :
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदेच्या एमबीए विभागातील पाच विद्यार्थ्यांची व्ही-ट्रान्स (इंडिया) लि. या कंपनीमध्ये निवड झाली आहे. त्यांची वार्षिक ४ लाख रुपये पॅकेजवर निवड झाली आहे.
व्ही-ट्रान्स (इंडिया) लि. ही भारतातील नामांकित लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन सोल्यूशन्स क्षेत्रातील कंपनी असून, वाहतूक, कार्गो सेवा, वेअरहाऊसिंग आणि थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स यांसारख्या विविध सेवा पुरवते. कंपनीचे देशभरात विस्तृत नेटवर्क असून विविध उद्योगांच्या लॉजिस्टिक्स गरजा पूर्ण करण्यात कंपनी कार्यरत आहे. या कंपनीमध्ये दिशा देसाई, कीर्ती नलवडे, वैष्णवी घडशी, संकेत परीट आणि विघ्नेश कांबळे या विद्यार्थ्यांची निवड झाली.
या निवडीसाठी एमबीए विभागप्रमुख डॉ. गुणाली दिवाण, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. शोएब तांबोळी व प्लेसमेंट समन्वयक चैतन्य शहा यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, विश्वस्त तेजस सतेज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्त, डॉ. सतीश पावसकर, अधिष्ठाता प्रा. आर. एस. पोवार, असिस्टंट रजिस्ट्रार जितेंद्र यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या पाच विद्यार्थ्यांची व्ही-ट्रान्स कंपनीत निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
1.5kmh
46 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
27
°

