कोल्हापूर :
रिलायन्स जिओने अवघ्या १५ रुपयांत अनलिमिटेड ५जी डेटा देणारा नवा पॅक लॉन्च केला आहे. या पॅकची वैधता २४ तास असून, या कालावधीत ग्राहकांना कोणत्याही डेटा मर्यादेची चिंता न करता हाय-स्पीड ५जी इंटरनेटचा वापर करता येणार आहे. जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन जिओने हा विशेष पॅक सादर केला आहे.
या नव्या पॅकमुळे ग्राहकांना ४के क्वालिटीमध्ये चित्रपट आणि व्हिडिओ पाहता येतील. तसेच लाइव्ह स्पोर्ट्स स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंगचा आनंद घेण्यासोबतच मोठ्या फाइल्स डाउनलोड करणे, सॉफ्टवेअर अपडेट करणे आणि क्लाउडवर डेटा अपलोड करणे यांसारखी कामेही सहज करता येतील.
या पॅकच्या माध्यमातून ग्राहक आपल्या ५जी स्मार्टफोनचा वाय-फाय हॉटस्पॉट म्हणून वापर करून लॅपटॉप आणि टॅबलेटवरही इंटरनेट वापरू शकतील. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, रिमोट वर्क आणि अन्य ऑनलाइन कामे करणे अधिक सोयीचे होणार आहे.
जिओचा १५ रुपयांचा हा डेटा पॅक देशभरातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक मायजिओ ॲप, जिओ डॉट कॉम, रिटेल स्टोअर्स तसेच थर्ड पार्टी रिचार्ज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा पॅक त्वरित ॲक्टिव्हेट करू शकतात.
जिओचा अवघ्या १५ रुपयांत दिवसभर अनलिमिटेड ५जी डेटा
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
1.5kmh
46 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
27
°

