Homeशैक्षणिक - उद्योग जिओचा नवा प्लॅन

जिओचा नवा प्लॅन

• ₹१० हजारांचा एकदाच रिचार्ज ; तीन वर्षे रिचार्जची चिंता नाही
कोल्हापूर :
रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी १० हजार रुपयांचा तीन वर्षांच्या वैधतेचा नवा अनलिमिटेड प्लॅन सादर केला आहे. एकदाच रिचार्ज केल्यानंतर पुढील तीन वर्षे पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. दूरसंचार क्षेत्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्लॅन असल्याचा कंपनीचा दावा आहे. विशेष म्हणजे, पुढील तीन वर्षे या प्लॅनची किंमत आणि त्यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व सुविधा कायम राहणार आहेत. जिओचा हा नवा प्लॅन ७ नोव्हेंबर २०२६ पासून उपलब्ध आहे.
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज २.५ जीबी हाय-स्पीड डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता पूर्ण तीन वर्षे असेल.
कॉलिंग आणि डेटासोबतच ग्राहकांना जिओहॉटस्टार मोबाईलवरून हॉलिवूडमधील मनोरंजनपर आशय पाहता येणार आहे. यामध्ये थेट क्रीडा प्रक्षेपण, हॉटस्टार ओरिजिनल्स आणि मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. याशिवाय, १२ महिन्यांचे कॅनव्हा प्रो लाइट सबस्क्रिप्शन आणि फाइल्स, फोटो व कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी जिओएआयक्लाउडवर ५० जीबी मोफत स्टोरेजही मिळणार आहे.
ग्राहक मायजिओ ॲप, जिओची वेबसाइट, जिओ स्टोअर्स, रिटेल आउटलेट्स आणि जिओच्या अन्य रिचार्ज माध्यमांद्वारे या प्लॅनचा लाभ घेऊ शकतील.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27 ° C
27 °
27 °
47 %
1.5kmh
46 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
27 °

Most Popular

You cannot copy content of this page