कोल्हापूर :
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदे मधील सिव्हिल विभागाच्या तृतीय वर्षामध्ये असणाऱ्या शिवम हवालदारने शिवाजी विद्यापीठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकविला. ईश्वरपूर येथे होणाऱ्या आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
कोल्हापूर विभागीय क्रीडा परिषद अंतर्गत शिवाजी विद्यापीठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धा गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूरच्या संयुक्त विद्यमानाने शिवाजी विद्यापीठ क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये ६० ते ६५ या वजनी शिवमने द्वितीय स्थान मिळवले. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ईश्वरपूरच्या संयुक्त विद्यमानाने सर्जेराव यादव बॉक्सिंग हॉल ईश्वरपूर येथे होणाऱ्या अंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे.
शिवमच्या या यशाबद्दल टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतिश पावसकर यांनी त्याचे अभिनंदन केले. यावेळी अधिष्ठाता प्रा. आर. एस. पोवार, असिस्टंट रजिस्ट्रार जितेंद्र पोवार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिमखाना प्रमुख व्ही. बी. उतळे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के गुप्ता यांनी शिवमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या शिवमची आंतर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.5
°
C
28.5
°
28.5
°
65 %
2.9kmh
1 %
Tue
28
°
Wed
31
°
Thu
31
°
Fri
30
°
Sat
29
°

