कोल्हापूर :
मुंबई येथील याॅट क्लब येथे नुकतीच कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए) स्टेडियम ३६० मुल्यांकन समितीची बैठक पार पडली.
यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अग्रणी सल्लागार कंपन्याकडून संभाव्य स्टेडियम ३६० या स्टेडियमच्या डिझाईन, मैदान व त्या अनुषंगाने असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा यांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये कंपन्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट व क्रीडा क्षेत्रातील अनुभव व दर्जा याची खास चाचणी घेवून गुणवत्ता व कार्यक्षमता याबाबत मुल्यांकन प्रक्रिया राबवण्यात आली. यामधुन सल्लागार एजन्सीची अंतीम निवडीसाठी निश्चित करण्यात आले आहे.
पुढील सादरीकरण लवकरच कोल्हापूर येथे होणार असुन यामधुन अंतीम सल्लागार कंपनीची निवड स्टेडियम तांत्रिक सल्ल्लागार समितीपुढे केली जाईल.
याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे व केडीसीएचे मार्गदर्शक व माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, स्टेडियम ३६०चे कन्सलटंट श्रीकांत के., यौवराज शहाजीराजे छत्रपती, केडीसीएचे उपाध्यक्ष अभिजीत भोसले, सेक्रेटरी मदन शेळके व खजानिस शीतल भोसले, मार्गदर्शक केव्हीन थाॅमस व राज निंबाळकर या सर्वाच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.
यापुढे स्टेडियमचे काम लवकर होण्यासाठी अनुभवी व तज्ञांची तांत्रिक समिती केलीे असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेडियम ३६० ची अंतीम निवड व कामाची पुढील दिशा ठरविण्यात येईल.
——————————
केडीसीए इंटरनॅशनल स्टेडियम उभारणी मुल्यांकन समितीची बैठक मुंबईत संपन्न
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.5
°
C
28.5
°
28.5
°
65 %
2.9kmh
1 %
Tue
28
°
Wed
31
°
Thu
31
°
Fri
30
°
Sat
29
°

