कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची महिला क्रिकेट खेळाडू मधुरा इंगवलेची भारतीय क्रिकेट नियमक मंडळ (बीसीसीआय) च्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महिला २३ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धा २०२६-२७ साठी महाराष्ट्र महिला संघात निवड झाली आहे.
ही स्पर्धा दि.१४ ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रायपूर येथे होणार आहे. स्पर्धा टी-२० साखळी पध्दतीची असुन महाराष्ट्र महिला संघ ईलीट ड ग्रुप मध्ये आहे. या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह हैदराबाद, बिहार, केरळ, कर्नाटक व झारखंड या महिला संघांचा समावेश आहे.
मधुरा इंगवले ही गेली तीन ते चार वर्षे कोल्हापूर जिल्हा महिला संघातून खेळत आहे. मागील वर्षी कोल्हापूर जिल्हा महिला संघातून खेळताना निमंत्रित स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिची यावर्षीच्या महाराष्ट्र महिला संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झाली होती. या सराव शिबिरात व सराव सामने खेळवण्यात आले. या यामध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील संघात स्थान मिळवले.
मधुरा इंगवलेची टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला संघात निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
1.5kmh
46 %
Fri
30
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
27
°

