कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राष्ट्रीय स्तरावरील ‘माइंडक्राफ्ट हॅकेथॉन २०२६’ उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग व कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) स्टुडंट चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने या हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
या हॅकेथॉनमध्ये कर्नाटक, तामिळनाडू आणि नोएडा तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर, रत्नागिरी व संगमनेर येथील विविध महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध तंत्रज्ञानाधारित समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय विकसित करून त्यांचे सादरीकरण केले.
या स्पर्धेत नागपूर येथील ‘नायटिक्स’ संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाने त्रिमितीय भू-अभिलेख प्रणालीद्वारे जमिनीवरील व जमिनीखालील मालमत्तांच्या विविध स्तरांवरील मालकी हक्कांची नोंद ठेवण्याच्या समस्येवर उपाय सादर केला. कर्नाटक येथील ‘फॅन्टम क्रू’ संघाने कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे जुन्या व बहुभाषिक जमीन अभिलेखांचे स्वयंचलित डिजिटायझेशन, वर्गीकरण व पडताळणी करण्यावर आधारित प्रकल्पाला द्वितीय तर तर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या येथील ‘नोडिक’ संघाने सादर केलेल्या ISO 945 मानकांनुसार नोड्युलर कास्ट आयर्नमधील ग्रॅफाइट नोड्यूल्सचे प्रतिमांद्वारे स्वयंचलित विश्लेषण, वर्गीकरण व प्रमाण मोजण्याची प्रणालीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या तीन संघांना एकूण १ लाखांचे बक्षीस देण्यात आले.
हॅकेथॉनचे आयोजन सी.एस.आय.च्या फॅकल्टी कोऑर्डिनेटर डॉ. पूजा पाटील, यांच्या नेतृत्वाखाली आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. राधिका ढणाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पुण्यातील तांत्रिक क्षेत्रातील नामांकित उद्योगतज्ज्ञ सागर सावंत आणि सौरभ ठोके यांनी प्रकल्पांचे परीक्षण केले. सूरज मुंडे, ताहिर पटेल आणि मिलोष्का लिमा यांचा आयोजनामध्ये विशेष सहभाग राहिला. याशिवाय विविध टीमनी यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली.
हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. एस. पवार, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनी विभागप्रमुख व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
——————————
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘माइंडक्राफ्ट हॅकेथॉन’ उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
28.6
°
C
28.6
°
28.6
°
68 %
3kmh
16 %
Wed
29
°
Thu
31
°
Fri
30
°
Sat
29
°
Sun
31
°

