कोल्हापूर :
येथील विराज सरनाईक व विनीत जिरगे या तरुण खेळाडूंनी मुंबई येथे झालेली अतिशय अवघड व खडतर असणारी योद्धा स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण केली. ही स्पर्धा भर उन्हात खुल्या मैदानात झाली.
योध्दा स्पर्धेत एकूण ५ किलोमीटर धावणे (प्रत्येकी ७०० मीटर नंतर वेगळे फंक्शनल क्रीडा प्रकार), १ हजार मीटर रोईंग, ५० मीटर पर्यंत १५० किलो वजनाचे स्लेड पुश, ५० मीटर पर्यंत १०० किलो वजनाचे स्लेड पूल, प्रत्येक हातात २४ किलो वजन असे एकूण ४८ किलो वजन घेऊन २०० मीटर फार्मर्स कॅरी, २ फुटापर्यं ३० उंच उड्या, २० किलोचे १०० मीटर सॅन्डबॅग लंजेस व ६ किलो चा बॉल ९ फुटापर्यंत टाकून ७५ वॉल बॉल स्कॉट्स मारणे असे विविध अडथळे पार करावे लागतात.
विराज सरनाईकने यापूर्वी परदेशातील हायरॉक्स स्पर्धा पूर्ण करण्याचा पहिला कोल्हापूरकर म्हणून मान मिळवला आहे. विराज व विनीत यांना अमित पाटील (कुडित्रेकर), डॉ. अमित पवार, रग्गेडिअनचे आकाश कोरगावकर, राज कोरगावकर, प्रशांत डांगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————
विराज-विनीत यांनी जिंकली योद्धा स्पर्धा
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26
°
C
26
°
26
°
53 %
1.5kmh
0 %
Sat
26
°
Sun
27
°
Mon
29
°
Tue
31
°
Wed
30
°

