Homeकला - क्रीडागोल्फ स्पर्धेत कृष्णा पंजाब रॅप्टर्स जीसीच्या करणदीप कोचर याला विजेतेपद

गोल्फ स्पर्धेत कृष्णा पंजाब रॅप्टर्स जीसीच्या करणदीप कोचर याला विजेतेपद

• आर्यन रूपा आनंदला उपविजेतेपद
कोल्हापूर :
ऑरो गोवा इगल गोल्फ क्लबतर्फे आयोजित व ऑरो रिआल्टी प्रायोजित ऍम ग्रीन आयजीपीएल मोसमातील ऑरो रिआल्टी इन्व्हिटेशनल गोल्फ स्पर्धेत कृष्णा पंजाब रॅप्टर्स गोल्फ क्लब (जीसी)च्या करणदीप कोचरने शानदार खेळाचे प्रदर्शन करत विमत्रा चेन्नई लायन्स जीसीच्या गगनजीत भुल्लरच्या सलग तीन विजेतेपदांच्या मालिकेला पूर्णविराम दिला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती आणि कोचरची मैत्रीण प्रणवी उर्स हिने त्याची कॅडी म्हणून जबाबदारी सांभाळली. तिच्या उपस्थितीने कोचरला मोठा मानसिक आधार मिळाला.
पुणे गोल्फ कोर्स येथे पार पडलेल्या स्पर्धेत ५४ होलच्या तीन दिवसांच्या खेळानंतर कोचर, भुल्लर आणि आरव्हीआर दिल्ली ब्लू बुल्स जीसीचा आर्यन रूपा आनंद हे तिघेही १०-अंडर पार अशा समान गुणांसह आघाडीवर होते. त्यानंतर विजेतेपदाचा निर्णय घेण्यासाठी प्ले-ऑफ खेळवण्यात आला. पहिल्या अतिरिक्त होलवर तिन्ही खेळाडूंनी बर्डी नोंदवली. मात्र दुसऱ्या अतिरिक्त होलवर भुल्लरला तीन फुटांवरून पुट करता आला नाही, तर आर्यनलाही यश मिळाले नाही. कोचरने मात्र संयम आणि अचूकतेच्या जोरावर विजेतेपदावर नाव कोरले. ऍम ग्रीन आयजीपीएल टूरवरील सलग तिसऱ्या स्पर्धेचा निकाल प्ले-ऑफमध्ये लागला.
पुण्याचा गुणवान खेळाडू उदयन माने यालाही आर्यन आणि कोचर यांच्याबरोबर प्ले ऑफ यामध्ये प्रवेश करण्याची सुवर्णसंधी होती. परंतु निर्णायक १८ व्या होलचा लक्ष्यवेध करण्यासाठी किमान बर्डी करणे आवश्यक होते. परंतु अखेरच्या होलची बर्डी हुकल्यामुळे त्याला ९-अंडर ६६ अशा गुणांसह संयुक्त चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले व प्ले ऑफच्या फेरीच्या बाहेर फेकला गेला.
कोचरचे हे दुसरे आयजीपीएल विजेतेपद असून, यापूर्वी त्याने गतवर्षी आयजीपीएल दुबई स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. गतवर्षी मुंबई येथे प्रणवी उर्सच्या मागे राहून त्याने उपविजेतेपद मिळवले होते, तर गेल्या महिन्यात हैदराबाद येथे भुल्लरच्या मागे राहून त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. विजयानंतर काही मिनिटांतच कोचरने आपल्या बॅगेतून रोलेक्स घड्याळ बाहेर काढून ते परिधान केले आणि त्यानंतर विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारली.
अ‍ॅट्री मुंबई गरुडास जीसीच्या अमन राजने स्पर्धेच्या अंतिम दिवशी ७-अंडर ६४ अशी उत्कृष्ट खेळी साकारली. या कामगिरीच्या जोरावर त्याने फ्लाइंग मॅन कोलकाता टायगर्स जीसीच्या वरुण परिख (६८) याच्यासह संयुक्त सहावे स्थान मिळवले. फिनिक्स हैदराबाद फायरबर्ड्स जीसीचा सातत्यपूर्ण कामगिरी करणारा सचिन बैसोया पुन्हा एकदा अव्वल दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवत आठव्या क्रमांकावर राहिला. विमत्रा चेन्नई लायन्स जीसीच्या यशस चंद्राने नववे स्थान पटकावले. युनिको गुरुग्राम टस्कर्स जीसीचा पुकराज सिंग गिल आणि फ्लाइंग मॅन कोलकाता टायगर्स जीसीचा सय्यद साकिब अहमद यांनी संयुक्तपणे अव्वल दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवत स्पर्धेची सांगता केली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26 ° C
26 °
26 °
53 %
1.5kmh
0 %
Sat
26 °
Sun
27 °
Mon
29 °
Tue
31 °
Wed
30 °

Most Popular

You cannot copy content of this page