Homeशैक्षणिक - उद्योग घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

कोल्हापूर :
संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई डे बोर्डिंग स्कुलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. संजय घोडावत स्टेडियमवर शनिवारी (दि.२१) सकाळी ९:१५ वाजता या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूरचे डीवायएसपी अमोल ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती उपस्थित होत्या. सीबीएसई डे बोर्डिंगच्या प्राचार्य अस्कर अली यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रीडाध्वज पुजन, ज्योत प्रज्वलन व संचलनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व विविध खेळांचे उत्कृष्ट संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. शाळेमध्ये शिकवले जाणारे बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तायक्वांदो, जिम्नॅस्टिक, हॉर्स रायडिंग या खेळांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानंतर विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले. १००, २००, ४००, ६०० आणि ८०० मीटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी यांसारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सर्व स्पर्धा अग्नी, त्रिशूल, पृथ्वी, आकाश या हाऊसमध्ये विभागलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पार पडल्या.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे अमोल ठाकूर व संचालिका सस्मिता मोहंती यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. संस्थापक संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनीही क्रीडा महोत्सव कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26 ° C
26 °
26 °
53 %
1.5kmh
0 %
Sat
26 °
Sun
27 °
Mon
29 °
Tue
31 °
Wed
30 °

Most Popular

You cannot copy content of this page