Homeशैक्षणिक - उद्योग चांगल्या जीवनशैलीतून सामाजिक शांतता, राष्ट्रउभारणी शक्य : डॉ. बी. आर. कोरे

चांगल्या जीवनशैलीतून सामाजिक शांतता, राष्ट्रउभारणी शक्य : डॉ. बी. आर. कोरे

• डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये मार्गदर्शन
कोल्हापूर :
दैनंदिन जीवनातील छोट्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणल्यास व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आदर्श जीवनमूल्ये, नैतिक आचरण आणि चांगली जीवनशैली यांचा स्वीकार केल्यास केवळ वैयक्तिक जीवनच नव्हे, तर सामाजिक शांतता, राष्ट्रीय आनंद निर्देशांक आणि राष्ट्रउभारणीलाही हातभार लागतो, असे मत अश्विनी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कोल्हापूरचे ज्येष्ठ शल्यचिकित्सक व मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. बी. आर. कोरे यांनी व्यक्त केले.
डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर-इंडिया बायोएथिक्स युनिटच्यावतीने स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, कोल्हापूर येथे ‘जागतिक बायोएथिक्स दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ‘शांततेसाठी जैवनीतिशास्त्र’ या विषयावर डॉ. कोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. कोरे यांनी आदर्श जीवनमूल्ये आणि जैवनीतिशास्त्र यांचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केला. वैयक्तिक आरोग्य, सामाजिक जबाबदारी, नैतिक मूल्ये आणि शांततापूर्ण समाजनिर्मिती यांचा परस्परसंबंध त्यांनी अधोरेखित केला.
स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. अर्चना सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. अभिजीत मटकर यांच्यासह प्राध्यापक  व  विद्यार्थी उपस्थित होते.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26 ° C
26 °
26 °
53 %
1.5kmh
0 %
Sat
26 °
Sun
27 °
Mon
29 °
Tue
31 °
Wed
30 °

Most Popular

You cannot copy content of this page