कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठांतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष व महिला या दोन्ही गटात डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज संघानी विजेतेपद मिळवले.
डी. वाय. पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कदमवाडी येथे झालेल्या या स्पर्धेचे उदघाटन मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राजेश खाय्लाप्पा यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक (विद्यार्थी कल्याण) डॉ. अद्वैत राठोड, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, प्रा. सागर जानराव, ऋषिकेश कुंभार, डॉ. सोनिया लोहाना, रोहन वाडकर, सुशांत कायपुरे वैष्णवी कौलगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरुष गटात मेडिकल, फिजिओथेरपी, फार्मसी, नर्सिंग, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आणि हॉस्पिटलिटी या ६ संघांनी, तर महिला गटात ५ संघांनी सहभाग घेतला. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुरुष गटात डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज संघाने डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी संघावर विजय मिळवला. तर महिला गटात डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज संघाने डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फ़िजिओथेरपी संघावर मात करत विजेतेपद मिळवले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी विजेत्या संघांचे आणि खेळाडूंचे अभिनंदन केले.
——————————
डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेजला व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
28.9
°
55 %
3.6kmh
4 %
Mon
30
°
Tue
30
°
Wed
30
°
Thu
30
°
Fri
29
°

