कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव २०२६-२७ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करीत सर्वसाधारण सांघिक उपविजेतेपद पटकावले. या महोत्सवात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी तब्बल १७ कलाप्रकारांत पारितोषिके मिळवून आपल्या कलागुणांचा ठसा उमटविला. याशिवाय वाङ्मय कलाप्रकारात सर्वसाधारण विजेतेपद, तर संगीत कलाप्रकारात सर्वसाधारण उपविजेतेपद प्राप्त केले.
महाराष्ट्राचे मा. कुलपती यांच्या कार्यालयामार्फत आयोजित हा महोत्सव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे दि. १९ ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पार पडला. महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचा ५५ सदस्यीय संघ सहभागी झाला. विविध कलाप्रकारांतील सादरीकरण, सर्जनशीलता आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर संघाने हे यश संपादन केले.
या स्पर्धेत सुगम संगीत, लोकसंगीत वाद्यवृंद, वक्तृत्व, मूकनाट्य, स्थळचित्र, व्यंगचित्र, रांगोळी आणि नाट्यसंगीत या आठ कलाप्रकारांत प्रथम क्रमांक मिळविला. शास्त्रीय नृत्य, वादविवाद आणि कातरकाम या तीन कलाप्रकारांत द्वितीय क्रमांक, तर शास्त्रीय तालवाद्य, पाश्चिमात्य एकल वादन, प्रहासिका, स्थळ छायाचित्रण, लघुपट आणि सांस्कृतिक शोभायात्रा या सहा कलाप्रकारांत तृतीय क्रमांक पटकाविला.
या यशामुळे शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची साहित्य, संगीत, नाट्य, ललित कला, वक्तृत्व आणि दृश्यकलांसह विविध क्षेत्रांतील गुणवत्ता सिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे, वाङ्मय कलाप्रकारात सर्वसाधारण विजेतेपद आणि संगीत कलाप्रकारात सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवित विद्यापीठाने सांस्कृतिक क्षेत्रातील आपले स्थान अधोरेखित केले.
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सावलीराम घाणे आणि अधीक्षक सुरेखा आडके यांच्यासह संघव्यवस्थापक म्हणून वारणा महाविद्यालय, ऐतवडे खुर्द, सांगली येथील डॉ. सूरज चौगुले आणि भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगाव येथील डॉ. शिला मोहिते यांनी जबाबदारी सांभाळली. या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
——————————
इंद्रधनुष्य’मध्ये शिवाजी विद्यापीठाला सर्वसाधारण सांघिक उपविजेतेपद
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
28.9
°
51 %
3.6kmh
20 %
Tue
30
°
Wed
30
°
Thu
30
°
Fri
29
°
Sat
28
°

