• डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात व्याख्यान
कोल्हापूर :
अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षितता ही प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडित महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे अन्न उद्योगात कार्यरत होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अन्नसुरक्षा नियम, गुणवत्ता मानके आणि सुरक्षित अन्ननिर्मितीच्या पद्धतींचे सखोल ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन विभाग कोल्हापूरचे माजी सहायक आयुक्त उदय लोहकरे यांनी केले.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या फूड टेक्नॉलॉजी विभागातर्फे ‘फूड सेफ्टी रेग्युलेशन, स्टँडर्ड्स अँड सेफ फूड प्रॅक्टिसेस’ या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उदय लोहकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी अन्नसुरक्षा नियम व मानके, अन्नाची गुणवत्ता, सुरक्षित अन्न हाताळणी, स्वच्छता तसेच अन्न उत्पादन व प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. अन्न उद्योगामध्ये गुणवत्ता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असून, भविष्यातील फूड टेक्नॉलॉजिस्टची यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फूड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. एम. इंगळे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी अन्नविषयक जागृती, अन्नाची गुणवत्ता व सुरक्षितता तसेच अन्नसुरक्षेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उदय लोहकरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी देवांशी चॅटर्जी हिने केले, तर रोहन आर. याने आभार मानले. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे, सहायक प्राध्यापक डॉ. स्नेहल खांडेकर आणि शीतल पाटील यांचे सहकार्य लाभले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता आणि कुलसचिव डॉ. जे. ए. खोत यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
——————————
अन्न उद्योगात सुरक्षा नियम व गुणवत्ता मानके यांचे ज्ञान गरजेचे : उदय लोहकरे
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29.3
°
C
29.3
°
29.3
°
64 %
2.5kmh
100 %
Sat
29
°
Sun
31
°
Mon
31
°
Tue
31
°
Wed
31
°

