• सायबर जनजागृती मोहिमेचा एनआयटीमधून शुभारंभ
कोल्हापूर :
आपली सायबर सुरक्षा आपल्याच हातात आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी प्रतिपादन केले. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे महिनाभर चालणाऱ्या ‘सायबर जनजागृती मोहिमेचा’ शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) मधून झाला, त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, देशात गेल्या वर्षी सायबर गुन्हेगारांनी लोकांना तब्बल २३००० कोटी रुपयांना गंडा घातला आहे. काॅलेजवयीन तरूण-तरूणींच्या फोटोंचे एआयद्वारे माॅर्फिंग करणे, ॲप, ईमेल व मेसेजमधून आमिष दाखवून मोबाईलचा ताबा घेणे, डिजिटल अटक करणे असे प्रकार वाढले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी मोबाईलचा वापर गरजेपुरता ठेवावा, आपली बँकिंग माहिती, फोटो, व्हिडिओ इतरांना देवू नयेत, .apk व तत्सम फाईल्स उघडू नयेत, ऑनलाईन आर्थिक व्यवहार खात्री करूनच करावेत.
एनआयटीचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी, सायबर सुरक्षेस पूरक असलेल्या मोबाईलमधील संयोजनांची व क्लुप्त्यांची माहिती दिली. यावेळी सायबर संस्थेच्या डी. के. शिंदे समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी प्रा. महेंद्र जनवाडे यांच्या मार्गदर्शनात सायबर क्राईम विषयावर पथनाट्य सादर केले. तसेच, एनआयटीमधील एनएसएस आणि एआय नेक्सस क्लबच्या विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा विषयक फलक प्रदर्शित केले.
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29.3
°
C
29.3
°
29.3
°
64 %
2.5kmh
100 %
Sat
29
°
Sun
31
°
Mon
31
°
Tue
31
°
Wed
31
°

