Homeसण - उत्सवकोल्हापूरच्या गणेशोत्सवाला लाभणार जागतिक ओळख

कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला लाभणार जागतिक ओळख

• नागरिकांनी ‘Bappa.org’ वर नोंदणी करावी : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर :
गणेशोत्सव जागतिक स्तरावर नेण्यासाठी व या गौरवशाली परंपरेला युनेस्कोचा (UNESCO) वारसा दर्जा व आंतरराष्ट्रीय मानांकने मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूरची गणेशोत्सव परंपरा ही अत्यंत समृद्ध आणि ऐतिहासिक आहे. आपल्या जिल्ह्यातील ही संस्कृती, कला आणि घरगुती परंपरा जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. सर्व कोल्हापूरकरांनी, गृहनिर्माण संस्थांनी आणि गणेश मंडळांनी Bappa.org वर नोंदणी करून या लोकचळवळीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
या मोहिमेची कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खालीलप्रमाणे नियोजन केले आहे:
घरोघरी बाप्पा’ उपक्रम : जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण, पारंपरिक व ऐतिहासिक वारसा असलेल्या घरगुती गणेशोत्सवाची माहिती, कौटुंबिक विधी, सजावट व खाद्यपरंपरा नागरिकांनी Bappa.org या पोर्टलवर तसेच 9136172681 या क्रमांकावर WhatsApp च्या माध्यमातून अपलोड कराव्यात.
शासनाचे प्रमाणपत्र : पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या नागरिकांना राज्य शासनाचे अधिकृत ‘Digital Cultural Preserver Certificate’ देऊन सन्मानित करण्यात येईल.
कला व कलापरंपरांचे दस्तऐवजीकरण : जिल्ह्यातील मूर्तिकार, कारागीर, लोककलावंत आणि विविध ६४ कलांशी संबंधित व्यक्तींनी आपल्या कौशल्याची माहिती या डिजिटल मंचावर नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
92 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page