Homeकला - क्रीडाडॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलच्या मुलींचा संघ पाचव्यांदा विजेता

डॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलच्या मुलींचा संघ पाचव्यांदा विजेता

• विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा
• स्नेहा कोळी ठरली ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’
कोल्हापूर :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलच्या मुलींच्या संघाने आपल्या कौशल्याच्या आणि धडाकेबाज खेळाच्या जोरावर अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात कृषी महाविद्यालय, पुणे संघावर तब्बल २७  विरुद्ध ११ गुणांनी मात करत तळसंदे कृषी संघाने पाचव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
नाशिक येथील संदीप फाउंडेशन कृषी महाविद्यालयात (महिरावणी) १८ व १९ सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा झाली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १० जिल्ह्यांमधून नामांकित १२ महाविद्यालयांच्या संघांनी यात सहभाग नोंदवला होता. सुरुवातीपासूनच डॉ. डी. वाय. पाटील संकुलाच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवत थेट अंतिम फेरीत धडक मारली होती.
पुणे कृषी महाविद्यालयाविरुद्ध झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात डी. वाय. पाटील कृषीच्या खेळाडूंनी आक्रमक चाली रचत सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. कर्णधार स्नेहा कोळी हिने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत सर्वाधिक १६ पॉईंट्स नोंदवले, तर उपकर्णधार योगिता रणनवरे हिने ६, वैष्णवी हुबाले हिने ४ आणि श्रेया खेडकर हिने १ पॉईंट नोंदवत संघाला २७ पॉईंट्स मिळवत  निर्णायक आघाडी मिळवून दिली. संपूर्ण स्पर्धेत आणि अंतिम सामन्यात केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर स्नेहा कोळी हिला स्पर्धेतील ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ या बहुमानाने गौरवण्यात आले. महात्मा फुले कृषी  विद्यापीठ राहुरीचे माजी अधिष्ठाता डॉ. बी. डी. भाकरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवरी, संदीप फाउंडेशन कृषी महाविद्यालय माहीरवाणी (नाशिक) चे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
विजेत्या संघात कर्णधार स्नेहा कोळी, उपकर्णधार योगिता रणनवरे, वैष्णवी हुबाले, श्रेया खेडकर, पायल लोहार, सानिका पाटोळे, सानिका पाटील, सिद्धी पवार, ऋतुजा गायकवाड, दीक्षा कांबळे व प्रणोती पाटील यांचा समावेश होता.
या खेळाडूंना शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा. ए. एस. बंद्रे व प्रशिक्षक  वेदांत भानवसे यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंना प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, इन्चार्ज पी. डी. उके, आर. आर. पाटील व विद्यार्थी कल्याण अधिकारी ए. बी. गाताडे यांचे प्रोत्साहन लाभले.
सलग पाचव्यांदा विद्यापीठस्तरीय अजिंक्यपद पटकावल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी  पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षक प्रा. बंद्रे यांचे अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.1kmh
92 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page