कोल्हापूर :
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने गारगोटी परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी भेटीगाठी आणि संवादाचा सिलसिला सुरू आहे. विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आणि संस्थाचालक यांच्याशी संपर्क साधत शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न, अपेक्षा आणि भविष्यातील आव्हानांवर संवाद साधला.
याच अनुषंगाने आबिटकर नॉलेज सिटी कॅम्पस, पाल, गारगोटीचे चेअरमन आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर तसेच सदगुरू बाळूमामा शिक्षण प्रसारक मंडळ, मुदाळचे कार्यवाहक तथा सचिव विकासभैय्या कृष्णराव पाटील यांची कौस्तुभ गावडे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विक्रमसिंह आबिटकर, श्रीनिवास पाटील, दयानंद लोहार, आकाश पाटील, सचिन जाधव, सतीश गौड, कृष्णात पाटील, शिवाजी पाटील, नारायण जाधव, निवृत्ती गुरव, किशोर बर्गे, राजेंद्र व्हटकर, शहीद वीरपत्नी लक्ष्मी संकुलचे संचालक प्रशांत पालकर, उपप्राचार्य सचिन लोहार, आनंद गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब व्हरकट आणि सिद्धिविनायक आय. टी. आय. चे संस्थापक मनोज आळेकर तसेच विविध शिक्षक संघटनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
या भेटीच्या निमित्ताने शैक्षणिक संस्थांचे कार्य, शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, शिक्षकांच्या अपेक्षा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेले संस्थात्मक सहकार्य यांसह विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील घटकांशी सातत्यपूर्ण संवाद ठेवणे आणि त्यांच्या समस्या व अपेक्षा समजून घेणे, हा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील जनसंपर्काचा महत्त्वाचा भाग असल्याचे या भेटींमधून दिसून येते.
शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी होणाऱ्या या भेटीगाठींमुळे प्रचाराच्या अनुषंगाने संवादाचे व्यासपीठ निर्माण होत असून, शिक्षकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्याच्या भूमिकेतून कौस्तुभ गावडे यांचा जनसंपर्क सुरू असल्याचे चित्र आहे.
——————————
गारगोटी परिसरात कौस्तुभ गावडे यांचा शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद
Mumbai
scattered clouds
28.5
°
C
28.5
°
28.5
°
67 %
3kmh
41 %
Sun
28
°
Mon
32
°
Tue
31
°
Wed
31
°
Thu
31
°

