कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, तळसंदे येथील कृषी अभियांत्रिकी विभाग आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारण चळवळीत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची आठवण ठेवून हा दिवस साजरा करण्यात येतो. यावेळी विद्यार्थ्यांनी जलसंधारणाची शपथ घेत जल, मृदा आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी काम करण्याची प्रतिज्ञा केली.
डॉ. सारिका वांद्रे यांनी जलसंधारण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. मंगल पाटील यांनी मृदा व जलसंधारण विभागामध्ये उपलब्ध असलेल्या विविध संधींची माहिती देत जलसंधारण, मृदा संवर्धन, जलस्रोत व्यवस्थापन आणि संबंधित क्षेत्रांमध्ये कृषी अभियंत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
कॅम्पस संचालक डॉ. एस. बी. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांवर संधींसोबतच मोठी जबाबदारीही येते. बदलत्या काळातील विविध संधींचा प्रभावीपणे लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबतच कौशल्य, शिस्त, जबाबदारीची जाणीव आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव विकसित करून स्वतःला सक्षम बनवावे.
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे उपप्राचार्य प्रा. पी. डी. उके यांनी भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता जलसंधारण उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे सांगितले. सहाय्यक प्राध्यापक डॉ. वाय. व्ही. शेटे यांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करत पाणी हे जीवनासाठी अत्यंत मौल्यवान नैसर्गिक संसाधन असल्याचे सांगितले.
यावेळी दोन्ही संस्थांतील विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरणाद्वारे जलसंधारणाच्या विविध उपाययोजना, नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच शाश्वत जलव्यवस्थापनाच्या पद्धती प्रभावीपणे मांडल्या. तृतीय वर्ष कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध साहित्याचा वापर करून सैल दगडी बंधारा तयार केला. यासाठी प्रा. अमोल गाताडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
पोस्टर सादरीकरण स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सहायक प्राध्यापक डॉ. विनायक शिंदे, डॉ. योगेश शेटे आणि डॉ. विद्या बडदरे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सारिका वांद्रे आणि प्रा. स्नेहल हावळ यांनी केले. सूत्रसंचालन तृतीय वर्षातील विद्यार्थी पृथ्वीराज निकम आणि शितल देवकाते यांनी केले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, प्र-कुलपती ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता आणि कुलसचिव प्रा. डॉ. जे. ए. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डी. वाय. पाटील तळसंदे कॅम्पसमध्ये जलसंधारण दिन साजरा
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
78 %
5.1kmh
100 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
29
°

