कोल्हापूर :
येथील एनसीसी विभाग, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर, सह्याद्री प्रतिष्ठान व ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले मुडागड अभ्यास मोहीम आयोजित करण्यात आली होती.
सह्याद्रीच्या पश्चिमेकडील दुर्गम रांगेत, घनदाट अरण्याच्या कुशीत किल्ले मुडागड वसलेला आहे. या मोहिमेत इतिहास अभ्यासक मानसिंग चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण वनदुर्ग व टेहळणीचा किल्ला आणि ऐतिहासिक ‘काजिर्डा घाटाच्या’ सुरक्षेसाठी उभारलेल्या या किल्ल्याचा ऐतिहासिक आढावा आणि भौगोलिक रचना समजून घेण्यासोबतच, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी हत्तींसाठी राखीव ठेवलेल्या “शिवारण्य” जंगलाची समृद्ध माहिती उपस्थितांना सांगितली. दुर्गसंवर्धन काळाची गरज, सह्याद्री का जपायचा यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
पडसाळी गावातील दिलीप तुकाराम सावंत (काका) यांनी स्थानिक वाटाड्या म्हणून चांगले सहकार्य केले. भटकंतीचे नियोजन सह्याद्री प्रतिष्ठान, कोल्हापूर यांनी केले. विवेकानंद कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थिनी या अभ्यास मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.
या मोहिमेसाठी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, एनसीसी विभाग प्रमुख सी.टी.ओ. नम्रता नरेवाडीकर यांचे मार्गदर्शन लाभले. सह्याद्री प्रतिष्ठान बावडा आखाड्याचे अध्यक्ष, प्रशिक्षक यांच्यासह सह्याद्रीचे मावळे यांचे मार्गदर्शन लाभले. ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलवडे यांचे प्रोत्साहन लाभले.
——————————
विवेकानंदच्या एनसीसी छात्रांची किल्ले मुडागड अभ्यास मोहीम
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
78 %
5.1kmh
77 %
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
29
°
Tue
28
°

