Homeकला - क्रीडायुवकांनी क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करावे : खासदार धनंजय महाडिक

युवकांनी क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करावे : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर :
भारत सरकारचा खेलो इंडिया संवाद हा भारताच्या संपूर्ण राष्ट्रीय खेळाचा विकास कार्यक्रम असून भारतीय खेळ, संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची सुवर्णसंधी लाभलेली आहे. जो खेळेल त्याचे जीवन फुलाप्रमाणे फुलेल. खेळ हा केवळ पदके जिंकण्यासाठी नसून युवकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त आहे. खेळ खेळल्याने आपले जीवन आरोग्यसंपन्न होते. शरीर तंदुरुस्त राहते म्हणूनच खेलो इंडिया संवाद हा उपक्रम राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या निमित्ताने भारत सरकारने देशभर आयोजित केलेला आहे, असे मत राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.
विवेकानंद कॉलेजमध्ये खेलो इंडिया संवाद व राष्ट्रीय सेवा योजना उदघाटन झाले. त्याप्रसंगी खा. महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून देशातील तरुणांशी ऑनलाईन संवाद साधला त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
सभारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू वैष्णवी पवार व लॉन टेनिस खेळाडू ऐश्वर्या जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यानी केले. यावेळी संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे म्हणाले की, आजचा दिवस क्रीडा इतिहासात महत्वाचा असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या औचित्य साधून देशातील तरुणांशी संवाद साधला. विवेकानंद कॉलेजच्या वीरधवल खाडे, राही सरनोबत, कृष्णराज महाडिक यांनी आंतररराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त केला आहे.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले की, जुन्या काळी खेळाडूला कोणत्याच सुविधा मिळत नसूनही कोल्हापूरच्या खाशाबा जाधव यानी ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक मिळवले.  ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार याबरोबरच मैदानावर खेळणारा तंदुरुस्त युवा वर्ग हेच आनंदी जीवन आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात भरपूर यश मिळवून देशाचे नाव उज्वल करावे.
आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी मानले. सुत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील व कु. समृध्दी चौगुले यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस विभागाच्या वतीने प्रा. प्रविण बागडे, डॉ. राजश्री पाटील, प्रा. हेमंत पाटील, प्रा. सुभाष रानमाळे, ज्युनि.सायन्स विभाग प्रमुख प्रा. एम. आर. नवले, स्टाफ सेक्रेटरी प्रा. यु. एच. तिजाईकर, जिमखाना प्रमुख डॉ. विकास जाधव यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रा. सौ. एम. पी. गवळी, प्रा. पी. वाय. राठोड, डॉ. ए. जे. पाटील, प्रा. पी. यु. पाटील, प्रा. सौ. एस. एन. चव्हाण, प्रा. आर. एन. चौगुले, प्रा. एस. टी. खाडे, प्राध्यापक व विद्यार्थी, विद्यार्थिनी, खेळाडू उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
78 %
5.1kmh
77 %
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page