Homeकला - क्रीडाबॅडमिंटन स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

बॅडमिंटन स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

कोल्हापूर :
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) च्यावतीने आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात वीरेन सेठ, हार्दिक दिव्यांश, कार्तिक दुबे यांनी तर, मुलींच्या गटात  आदर्शिनी श्री बूपथी बालाजी, धिष्ठा सिंघा गोपीनाथ यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.
पी.ई.सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकित वीरेन सेठ याने नवव्या मानांकित भारताच्या अश्विन लेनिन मुथुराजचा  २१-१०, १०-२१, २१-१० असा तर, हार्दिक दिव्यांशने चौदाव्या मानांकित कार्तिक रूपा सुहासचा २१-११, २१-१६ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. कार्तिक दुबेने बाराव्या मानांकित आरुष पावसकरवर १७-२१, २१-१२, २१-१८ असा सनसनाटी विजय मिळवला. चुरशीच्या लढतीत तेराव्या मानांकित बोर्निल आकाश चांगमाईने अनयन बोराहचे आव्हान २१-१५, १९-२१, २१-१७ असे मोडीत काढले. तिसऱ्या मानांकित साई भत्राजूने वैभव सिंगला २१-१८, २३-२१ असे नमविले.
मुलींच्या गटात आदर्शिनी श्री बूपथी बालाजी हिने सहाव्या मानांकित राधा गाडगीळचा २१-१२, २१-१० असा सहज पराभव केला. धिष्ठा सिंघा गोपीनाथने सातव्या मानांकित हासना श्री मल्लावरपूचे आव्हान १९-२१, २१-१४, १३-०८ असे संपुष्टात आणले. ऋषिका नंदीने निशिका गोखेचा २१-१४, २१-१० असा तर,
युतीका चव्हाणने लावण्या कार्कीचा २१-१५, २१-१० असा पराभव करून आगेकूच केली.
याआधी स्पर्धेचे उदघाटन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीएमबीएचे मानद सरचिटणीस सीए रणजीत नातु, खजिनदार सारंग लागू, सह सचिव आनंद जोशी, स्पर्धा संयोजन सचिव राजीव बाग, गिरीश नातू, मिहीर रतनजामकर आदी मान्यवर उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
78 %
5.1kmh
77 %
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page