Homeकला - क्रीडाबॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अर्जुन रेड्डी अलुगुवेल्लीची विजयी सलामी

बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अर्जुन रेड्डी अलुगुवेल्लीची विजयी सलामी

कोल्हापूर :
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) च्यावतीने आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात भारताच्या अर्जुन रेड्डी अलुगुवेल्ली याने आठव्या मानांकित यूएईच्या आदित्य किरणचा २१-१८,१९-२१, २१-१९ असा पराभव करून विजयी सलामी दिली.
पी.ई.सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये मंगळवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित भारताच्या जगशेर सिंग खंगुर्रा याने नीरज नायर पीएसचा २०-२२, २१-०८, २१-१५ असा तर, वैभव सिंग याने वर्णन महंताचा २१-१०, २०-२२, २१-१९ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. चौदाव्या मानांकित भारताच्या कार्तिक रूपा सुहासने भुटानच्या टंडिन सोनमवर २१-०२, २१-०६ असा विजय मिळवला. नवव्या मानांकित भारताच्या अश्विन लेनिन मुथुराजने नेपाळच्या सदिप रायला २१-१२, २१-१२ असे पराभूत केले.
मुलींच्या गटात अक्षिता मनरल हिने सरयू सूर्यानेनीचे आव्हान २१-१३, २१-१७ असे मोडीत काढले. केतकी थिटेने यवर्णा रेणुश्री श्यामलारावला २१-१०, २१-१४ असे नमविले. श्रावणी बिरादारने लिओनी तायेंजामचा २१-१२, २१-१७ असा पराभव केला.

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
29.6 ° C
29.6 °
29.6 °
68 %
4.1kmh
83 %
Fri
30 °
Sat
31 °
Sun
31 °
Mon
30 °
Tue
31 °

Most Popular

You cannot copy content of this page