Homeशैक्षणिक - उद्योग सृजनात्मक लिखानामधून उत्तम करियर घडू शकते : सुदर्शन खोत

सृजनात्मक लिखानामधून उत्तम करियर घडू शकते : सुदर्शन खोत

कोल्हापूर :
सृजनात्मक लिखानामधून उत्तम करिअर घडू शकते असे मत सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते सुदर्शन खोत यांनी व्यक्त केले. विवेकानंद कॉलेजमधील वाङमय मंडळाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले की, लेखक दिग्दर्शक होण्यासाठी पैसा नाही तर कलात्मक विचार आणि बुद्धिमत्तेची गरज असते. भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी भरपूर वाचन करा. सृजनात्मक लेखन करण्यासाठी सातत्य आणि चिकाटी अत्यंत महत्वाची आहे.
वाङमय मंडळाच्या समन्वयक डॉ. कविता तिवडे यांनी वाङमय मंडळातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा घेतला आणि त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जातो ते स्पष्ट केले. राष्ट्रीय युवा साहित्य संमेलन, लेखकाशी भेट, सृजनात्मक लेखन कार्यशाळा अशा वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर होते. सृजनात्मक लिखाण करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सतत लिहीत राहणं आवश्यक आहे. आपले लिखाण जाणकारांकडून तपासून घेऊन त्यामध्ये सातत्याने सुधारणा करत राहणे देखील तितकेच गरजेचे आहे असे विवेचन त्यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षपाली नामे आणि तनुजा घोरपडे या विद्यार्थिनींनी केले तर आभार वाङमय मंडळाचे सदस्य डॉ. दिपक तुपे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. स्नेहा देसाई, डॉ. आरिफ महात, प्रा. आतिश खांडेकर तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
5.1kmh
89 %
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page