Homeकला - क्रीडाराष्ट्रीय पंच अजिंक्य गुजर यांची ज्युनियर नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी नियुक्ती

राष्ट्रीय पंच अजिंक्य गुजर यांची ज्युनियर नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी नियुक्ती

कोल्हापूर :
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनतर्फे कर्नाटकातील बेंगळुरू येथे दि. २५ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ज्युनियर बॉईज टियर-१ नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी के.एस.ए.चे राष्ट्रीय पंच अजिंक्य गुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अजिंक्य गुजर हे राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी कोल्हापूरातील अनेक नामवंत फुटबॉल संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ते न्यू कॉलेज येथे कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. खेळाडू म्हणून राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवल्यानंतर पंच म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अजिंक्य गुजर यांना केएसएचे पेट्रन-इन-चीफ श्री. शाहू छत्रपती महाराज, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे व्हाइस प्रेसिडेंट तसेच के.एस.ए.चे प्रेसिडेंट श्री. मालोजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या महिला समिती सदस्या सौ. मधुरिमाराजे छत्रपती, केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, फुटबॉल सेक्रेटरी व महाराष्ट्र रेफ्री बोर्ड सदस्य राजेंद्र दळवी यांचे प्रोत्साहन लाभले आहे.
तसेच महाराष्ट्र रेफ्री बोर्डचे अध्यक्ष धनराज मोरे यांचे विशेष मार्गदर्शन, कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव व सेक्रेटरी प्रदीप साळोखे यांचे मार्गदर्शन लाभले. न्यू कॉलेजचे प्राचार्य यांचेही अजिंक्य गुजर यांना प्रोत्साहन मिळाले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.7 ° C
28.7 °
28.7 °
68 %
2.6kmh
86 %
Sat
29 °
Sun
30 °
Mon
32 °
Tue
31 °
Wed
30 °

Most Popular

You cannot copy content of this page