• ११ ऑगस्टपासून तीन दिवस तपासणी
कोल्हापूर :
दिव्यांग बालके व युवकांना सक्षम जीवन जगता यावे यासाठी आवश्यक कृत्रिम अवयव व ऑर्थोटिक साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्यावतीने मंगळवार दि. ११ ऑगस्टपासून तीन दिवसीय मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राईज बायोनिक्स, इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हज ट्रस्ट आणि समृद्धी डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे मोफत कृत्रिम अवयव व ऑर्थोटिक मापन व तपासणी शिबिर होणार आहे.
लाईन बाजार येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हे शिबीर होणार आहे. यामध्ये ० ते १८ वर्षे वयोगटातील हालचालींशी संबंधित दिव्यांग बालके व युवकांची तज्ज्ञ डॉक्टर व तांत्रिक पथकाकडून तपासणी व मोजमापे घेतली जातील. लाभार्थ्यांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयव व ऑर्थोटिक साधने तयार करून त्यांचे वितरण स्वतंत्र कार्यक्रमात करण्यात येईल.
क्लिनिकल तपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार अँकल फूट ऑर्थोसिस, नी-अँकल फूट ऑर्थोसिस, गुडघ्याखालील व गुडघ्यावरील कृत्रिम पाय, हँड स्प्लिंट्स, स्पायनल ब्रेसेस, रोलॅटर्स, स्टँडिंग फ्रेम्स, विशेष खुर्च्या, लिंब लेंग्थ डिस्क्रेपन्सी ऑर्थो-प्रोस्थेसिस तसेच तज्ज्ञांनी सुचविलेली इतर आवश्यक कृत्रिम अवयव व ऑर्थोटिक साधने विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
लाभार्थ्यांनी शिबिरास येताना आधार कार्ड (बालक किंवा पालक) अथवा शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या गरजू असल्याचा पुरावा (बीपीएल रेशन कार्ड / उत्पन्नाचा दाखला / स्थानिक प्राधिकरणाने प्रमाणित केलेले स्वयंघोषणापत्र), शासकीय शाळेत शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र (लागू असल्यास), दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा यूडीआयडी कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी कागदपत्रे सोबत आणावीत. यासाठी सुशांत चंदनशिवे (७०२८९३१९०८), माधुरी मुसळे (८६६८२३२११५), अभिजीत पाटील (९०४९५९९७९२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
——————————
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन
Mumbai
moderate rain
27
°
C
27
°
27
°
89 %
2.6kmh
100 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°

