Homeकला - क्रीडाडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राधिकाचे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णयश

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राधिकाचे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णयश

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कु. राधिका क्षत्रिय  हिने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक पटकविले.
या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध जिल्ह्यातील नामांकित व अनुभवी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये राधिकाने सातत्यपूर्ण सराव,आत्मविश्वास आणि बौद्धिक कौशल्याच्या जोरावर आपले वर्चस्व सिद्ध करत विजेतेपदाला गवसणी घातली.
राधिकाच्या या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संजय पवार, डीन (आर अँड डी) डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, डीन  स्टुडंट  अफेअर्स डॉ. राहुल पाटील, प्रा. नीलिमा व्हटकर, विभागप्रमुख डॉ. मनिषा भानुसे यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
2.1kmh
6 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page