• वेतनश्रेणी वाढ होईपर्यंत आंदोलनावर ठाम
कोल्हापूर :
उच्च न्यायालयाप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाने संपूर्ण राज्यात सनदशीर मार्गाने आंदाेलनाला सुरुवात केली आहे. या आंदाेलनाचा पहिला टप्पा म्हणून बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी काळ्या फिती लावून कार्यालयीन कामकाजात सहभागी झाले.
राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी याबाबतचा प्रस्ताव मा. उच्च न्यायालयाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. परंतु, गेली दीड वर्षाहून अधिक काळ राज्य शासनाने हा प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे. या वेतनवाढ प्रस्तावासह न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाने आंदोलनाचा इशारा व संपाची रितसर नोटीस देऊन सनदशीर मार्गाने लढा सुरु केला आहे. यामध्ये १६ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करून निषेध नोंदविणे, त्यानंतरही शासनाने वेतनवाढ मंजूर केली नाही तर १६ आणि १७ ऑक्टोबर:२०२६ रोजी काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदविणे, तरीही निर्णय झाला नाही तर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी एक दिवस सामूहिक रजा आंदोलन करणे व या सर्व टप्प्यांनंतरही शासनाने ३१ जानेवारी २०२५ पासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढ प्रस्तावावर ठोस निर्णय घेतला नाही, तर १६ नोव्हेंबर २०२६ पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज, बुधवारी कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सकाळी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेपूर्वी जिल्हा न्यायालयाच्या पायऱ्यांवर एकत्र येत काळ्या फिती लावून कर्मचारी एकजूट दाखवून दिली. तसेच मागण्या मान्य न झाल्यास ठरविणेत आलेल्या रुपरेषेनुसार आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. त्यानंतर दिवसभर काळ्या फिती लावूनच आज न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज पार पाडले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना (वर्ग-३), ज्युडिशियल स्टेनोग्राफर्स असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन बेलिफ कर्मचारी संघटना तसेच कोल्हापूर जिल्हा न्यायालयीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सर्व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
कोल्हापुरात न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळी फित लावून कार्यालयीन कामकाज
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
83 %
2.1kmh
6 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
29
°
Sun
29
°

