Homeकला - क्रीडासई बोंडगेची महाराष्ट्राच्या ज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघात निवड

सई बोंडगेची महाराष्ट्राच्या ज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघात निवड

कोल्हापूर :
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथे सुरू असलेल्या ज्युनियर गर्ल्स राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ (टियर-१) मध्ये महाराष्ट्राच्या संघात कोल्हापूरच्या सई प्रकाश बोंडगे हिची निवड झाली आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) च्यावतीने मुंबईतील कुपरेज येथे गेल्या १४ दिवसांपासून निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून महाराष्ट्र राज्य ज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघाची निवड करण्यात आली असून, या संघात सई बोंडगे हिची निवड झाली आहे.
विफाने कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए)च्या जिल्हा संघातून तीन खेळाडूंची निवड केली होती. त्यापैकी सईने महाराष्ट्राच्या अंतिम संघात स्थान मिळविले आहे. सई ही श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कणेरी येथे शिक्षण घेत आहे. अनंतपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्रासह कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करणार आहे.
केएसए फुटबॉल समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक प्रदीप साळोखे, रघु पाटील, अमित शिंत्रे व शलाका जामदार यांनी जिल्हा संघासाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीचे कामकाज पार पाडले. सईच्या निवडीबद्दल केएसएचे पेट्रन-इन-चीफ श्री. शाहू छत्रपती महाराज, पेट्रन मेंबर संभाजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य, विफाचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या विफा महिला समितीच्या चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन. जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
31 ° C
31 °
29.9 °
66 %
3.1kmh
12 %
Wed
30 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page