Homeसामाजिकन्यूरो संस्था SCTIMSTकडून डॉ. शिवशंकर मारजक्के यांना "Award of Excellence" प्रदान

न्यूरो संस्था SCTIMSTकडून डॉ. शिवशंकर मारजक्के यांना “Award of Excellence” प्रदान

कोल्हापूर :
जागतिक कीर्तीचे न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मारजक्के यांना “Award of Excellence” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. न्यूरोसर्जरी आणि रुग्णसेवेतील अग्रगण्य नाविन्य, उद्योजकीय दृष्टी आणि ट्रान्सलेशनल उत्कृष्टता यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
हा पुरस्कार त्यांची मातृसंस्था SCTIMST, त्रिवेंद्रम (श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी – Institute of National Importance) कडून प्रदान करण्यात आला आहे. ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत येणारी एकमेव केंद्र सरकारी संस्था आहे आणि हृदय व मेंदूसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे स्वदेशातच विकसित करणारी भारतातील एकमेव संस्था आहे.
याबद्दल डॉ. मारजक्के म्हणाले की, हा वैयक्तिक सन्मान नाही. हा माझ्या आवड, चिकाटी, सातत्य, जिद्द, रुग्णसेवेतील करुणा, माझ्या संपूर्ण टीम आणि ‘Work is Worship’ या संकल्पनेचा सन्मान आहे. परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचे आशीर्वाद, मार्गदर्शन आणि पाठबळ हेच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
28.9 °
79 %
4.6kmh
10 %
Tue
29 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page