Homeइतरकोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेस मध्यरात्री उत्साहात प्रारंभ

कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेस मध्यरात्री उत्साहात प्रारंभ

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यात ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेला बुधवारी मध्यरात्री उत्साहात सुरुवात झाली. या भरतीचे उदघाटन मध्यरात्री जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते झाले. देश सेवेची उर्मी उराशी बाळगून मोठ्या संख्येने उमेदवार या भरतीसाठी उपस्थित होते.
सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल प्रशांत सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, लेफ्टनंट कर्नल डॉ. संबित पात्रा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन चवदार, तहसीलदार स्वप्निल पवार, सहाय्यक संचालक आर्मी भरती कार्यालय सुभेदार मेजर लखविंदर सिंग उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, ही भरती प्रक्रिया आगामी १७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी प्रशासनाकडून सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांसाठी भरती मैदान उत्तम स्थितीत तयार करण्यात आले असून, उमेदवारांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष वैद्यकीय (मेडिकल) टीम तैनात करण्यात आली आहे. विविध एनजीओच्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी अल्पोपहार (नाश्ता) आणि जेवणाची योग्य सोय करण्यात आली आहे. दूरवरून येणाऱ्या उमेदवारांना रेल्वे स्टेशन व बस स्थानकावरून भरती स्थळापर्यंत येण्या-जाण्यासाठी ‘केएमटी’मार्फत विशेष बससेवेची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासन आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या समन्वयातून कोल्हापुरातील ही अग्निवीर रॅली अत्यंत नियोजनबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
कर्नल प्रशांत सिंग म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेचे आयोजन अतिशय उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे. या संपूर्ण रॅलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल लष्करी अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे विशेष आभार मानले.
स्थानिक पोलीस प्रशासनाकडून रॅलीच्या संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सर्व हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही.
लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, जिल्हा प्रशासनाच्या या भक्कम पाठिंब्यामुळे कोल्हापूर परिसरातील जास्तीत जास्त तरुण मोठ्या संख्येने अग्निवीर म्हणून देशसेवेसाठी निवडले जातील.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
27 ° C
27 °
27 °
89 %
3.6kmh
9 %
Fri
28 °
Sat
29 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page