कोल्हापूर :
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष बी. आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यंदाही महाविद्यालयात १०० टक्के प्रवेश पूर्ण झाला आहे. यावेळी सर्वाधिक गुणांसह प्रवेश घेणाऱ्या गायत्री देशपांडे हिचा कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले की, वास्तुशास्त्र हे केवळ इमारतींच्या रचनेपुरते मर्यादित नसून समाजाच्या गरजा, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि मानवी जीवनशैली यांचा विचार करणारे व्यापक क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबत सर्जनशीलता, तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करून भविष्यातील आव्हानांसाठी स्वतःला तयार करावे. वास्तुशास्त्राच्या क्षेत्रातील बदलत्या संधी, व्यावसायिक कौशल्ये आणि वास्तुविशारद म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून सर्जनशीलता आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करावीत असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. संजय एस. पवार म्हणाले, महाविद्यालयाला मिळालेले १०० टक्के प्रवेशाचे यश हे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विद्यार्थी आणि पालकांनी दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कौशल्यांना नवी दिशा द्यावी.
स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे विभागप्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव यांनी अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक उपक्रम, विभागातील सुविधा तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध संधींची माहिती दिली. त्यानंतर नव्या विद्यार्थ्यांना स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील विविध विभाग, प्रयोगशाळा व शैक्षणिक सुविधांची प्रत्यक्ष भेटीतून माहिती देण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संजय एस. पवार, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, प्रवेश विभागप्रमुख आर. जी. बेन्नी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. प्रवेश समन्वयक प्रा. तिलोत्तमा पाडळे आणि प्रा. मनजीत जाधव यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
——————————
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28
°
C
28
°
28
°
62 %
3.9kmh
26 %
Thu
31
°
Fri
32
°
Sat
31
°
Sun
32
°
Mon
31
°

