Homeराजकियकोल्हापूरचा कायापालट करण्यास महायुती सरकार समर्थ : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूरचा कायापालट करण्यास महायुती सरकार समर्थ : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर :
कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध महत्त्वाच्या विकासकामांना गती देण्यात येत आहे. गेल्या साडेचार वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर शहरात अनेक लोकहितोपयोगी प्रकल्प राबवले जात आहेत. ही विकासकामे पूर्णत्वास आली असून, त्याचे दि.९ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आ. राजेश क्षीरसागर म्हणाले कि, विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाकडे आणि अपप्रचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, महायुती सरकार आपल्या गतिमान निर्णय पद्धतीद्वारे कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आणि समर्थ आहे. कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावत जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार वेगाने पावले उचलत आहे. गेल्या काही काळापासून विरोधकांकडून विकासकामांमध्ये अडथळे आणण्याचे आणि नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या राजकारणाला बाजूला सारत जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यावर महायुती सरकारने आपले लक्ष केंद्रित केले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, औद्योगिक प्रगती, पर्यटन वाढ आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन पातळीवर तातडीने निर्णय घेतले जात आहेत.
ते म्हणाले की, कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. प्रशासकीय पातळीवरील निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान केल्यामुळे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळाली आहे. महायुती सरकार कोल्हापूरचा कायापालट करूनच जनतेला दिलासा देईल, असा विश्वासही आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29 ° C
29 °
29 °
74 %
3.6kmh
35 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page