Homeइतरइंडोनेशियामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी वनताराची भागीदारी

इंडोनेशियामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी वनताराची भागीदारी

• इंडोनेशियात १० मोबाइल पशुवैद्यकीय रुग्णालये सुरू करण्यात येणार
कोल्हापूर :
भारतातील वनताराने इंडोनेशिया सरकारसोबत वन्यजीवांचे आरोग्य आणि संरक्षण या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत इंडोनेशियामध्ये १० ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ सुरू करण्यात येणार आहेत. तसेच हत्तींची देखभाल करणारे कर्मचारी आणि पशुवैद्यकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रसिद्ध वे कंबास एलिफंट हॉस्पिटलचे आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.
अद्ययावतीकरणानंतर वे कंबास रुग्णालयाचे ‘एलिफंट ट्रीटमेंट अँड केअर सेंटर’ म्हणून विकसित केले जाणार आहे. हे केंद्र मानवी देखरेखीखाली असलेल्या ६२ सुमात्रन हत्तींसह परिसरातील जंगलांमध्ये वास्तव्य करणाऱ्या सुमारे १०० जंगली सुमात्रन हत्तींच्या उपचार आणि देखभालीसाठी मदत करेल. गरज भासल्यास १० मोबाइल रुग्णालयांमार्फत वन्यजीवांना त्यांच्या अधिवासातच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी वनतारा तज्ज्ञ पशुवैद्यकीय सेवा, तांत्रिक सहकार्य, पायाभूत सुविधांसाठी मदत आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देणार आहे. हा कार्यक्रम इंडोनेशिया सरकार आणि त्याच्या संबंधित संस्थांच्या नेतृत्वाखाली राबविला जाणार आहे. या सर्व सुविधांची मालकी आणि संचालन इंडोनेशिया सरकारकडेच राहणार आहे.
इंडोनेशियाचे वनमंत्री राजा जूली अँटोनी यांनी सांगितले की, या भागीदारीमुळे देशाची वन्यजीव आरोग्य आणि संरक्षण क्षेत्रातील क्षमता अधिक मजबूत होईल. वनताराचे सीईओ विवान करानी म्हणाले की, वनतारा आपले पशुवैद्यकीय आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील कौशल्य इंडोनेशियासोबत शेअर करेल आणि त्याचबरोबर इंडोनेशियाच्या दीर्घकालीन संरक्षण अनुभवातून शिकण्याचाही प्रयत्न करेल.
अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या वनताराची ही भागीदारी त्याच्या आंतरराष्ट्रीय वन्यजीव संरक्षण कार्यक्रमांच्या विस्ताराचाही एक भाग आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29 ° C
29 °
29 °
74 %
3.6kmh
35 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page