Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील अभियांत्रिकी एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (एआयएमएल) विभागातील विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विभागातील विद्यार्थ्यांना २९ हून अधिक नामांकित कंपन्यांकडून ६८ प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. मोव्हेट या कंपनीमध्ये सना मुजावर हिला ९ लाख रुपये वार्षिक सर्वोच्च पॅकेज मिळाले आहे.
महाविद्यालयात झालेली विविध प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे ही निवडा झाली आहे. लॉन्च्ड ग्लोबल या कंपनीनमध्ये सर्वाधिक १२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. एड्युव्हर्सिटी, बंगळुरूने १० विद्यार्थ्यांची, अनलॉक्स अकॅडमी ८ इन्फोसिसने ६, वॉलस्टार टेक्नॉलॉजीजने ४ तर फोक्सवॅगन प्रा. लि. ने ३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
यामध्ये मोव्हेटमध्ये ९ लाख रुपये, एचपीमध्ये ८.५ लाख, ग्लोलॉजिक्स सोल्युशन्समध्ये ७.२ लाख रुपये, लॉन्च्ड ग्लोबलमध्ये ७ लाख रुपये, अनलॉक्स अकॅडमीमध्ये ६ लाख आणि झंवर ग्रुप मध्ये ५.५ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे. फॉक्स सोल्युशन्समध्ये ५.४६ लाख रुपये आणि मायक्रोलाइजमध्ये ४.८ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे. याशिवाय डिलॉईट सायबर गुरुकुल प्रोग्राम, एड्यु व्हर्सिटी, एक्सेलआर आणि इतर कंपन्यांनीही विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
या यशासाठी अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, एआयएमएल विभागप्रमुख प्रा. डॉ. सिद्धेश्वर पाटील, प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
28.9 ° C
28.9 °
28.9 °
64 %
2.2kmh
82 %
Sun
30 °
Mon
32 °
Tue
31 °
Wed
30 °
Thu
29 °

Most Popular

You cannot copy content of this page