कोल्हापूर :
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे येथे सीबीएसई साऊथ झोन-२ बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६-२७ या प्रतिष्ठित बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता एसजीआय स्टेडियम, अतिग्रे येथे होणार आहे.
स्पर्धेच्या उदघाटन समारंभासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते रेनॉल्ड राफेल जोसेफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तसेच संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त विनायक भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या राज्यातील विविध सीबीएसई शाळांमधून सहभागी होणाऱ्या युवा बॉक्सरना आपले कौशल्य, जिद्द आणि खेळ प्रदर्शित करण्याची संधी या स्पर्धेत मिळणार आहे. जवळपास ८१ शाळांमधील ५०० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन केले आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, क्रीडा संचालक विठ्ठल केंचन्नावर, क्रीडा विभाग, शिक्षक, प्रशिक्षक व कर्मचारी वर्ग परिश्रम करत आहेत.
——————————
घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई साऊथ झोन-२ बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.6
°
C
28.6
°
28.6
°
62 %
2.4kmh
4 %
Sun
30
°
Mon
31
°
Tue
31
°
Wed
30
°
Thu
29
°

