कोल्हापूर :
संजय घोडावत विद्यापीठातील ३१ विद्यार्थ्यांची मलेशियातील आय. एन. टी. आय. आंतरराष्ट्रीय विद्यापीठात एक क्रेडिट एक्सचेंज कार्यक्रम २०२६ साठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी नुकतेच यासाठी प्रस्थान केले.
घोडावत विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि जागतिक स्तरावरील शैक्षणिक संधींच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून यामध्ये विविध विभागांतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील ८, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील ८, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागातील ११, बीबीए विभागातील ३ आणि बीसीए विभागातील १ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
या विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक अनुभव, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अध्ययनाची संधी, विविध संस्कृतींचा परिचय तसेच व्यापक व्यावसायिक दृष्टिकोन प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली असून, त्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थी विनिमय कार्यक्रमाच्या अटींनुसार निवासाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, अधिष्ठाता, संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक, पालक आणि सर्व संबंधितांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
——————————
घोडावत विद्यापीठाच्या ३१ विद्यार्थ्यांची मलेशियातील विद्यापीठात निवड
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29.8
°
C
29.8
°
29.8
°
60 %
1.8kmh
4 %
Sun
30
°
Mon
31
°
Tue
31
°
Wed
30
°
Thu
29
°

