• प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यालयात शासकीय कामांचा निपटारा
कोल्हापूर :
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा अभियान’ अंतर्गत कोल्हापूर जिल्हा भाजप कार्यालय, नागाळा पार्क येथे सामान्य नागरिक तसेच भाजप पदाधिकारी यांच्या विविध प्रलंबित शासकीय प्रश्नांचा मोठ्या प्रमाणात निपटारा करण्यात आला.
या अभियानामध्ये शैक्षणिक, महसूल, शासकीय निधी, पोलीस प्रशासन तसेच शालेय शिक्षण आदी विषयांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे ओएसडी संतोष साखरे यांनी आपल्या टीमसह दिवसभर उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जवळपास २०० ते २५० नागरिक व भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष कार्यवाही करून त्यांच्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यात आला.
यावेळी भाजप कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव व भाजप कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांनी पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहून अभियानाचे नियोजन व समन्वय केला. याप्रसंगी सरचिटणीस विराज चिखलीकर, अमर साठे, भाजप अनुजा मोर्चाचे अध्यक्ष अनिल कामत उपस्थित होते.
अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी अनुजा मोर्चाचे प्रशांत अवघडे, राहुल सोनटक्के, संतोष तिवडे, सचिन सुतार, अमोल मांगले, लालासो पवार, नामदेव कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
नागरिकांच्या अडचणी केवळ ऐकून न घेता त्या संबंधित शासकीय यंत्रणांपर्यंत पोहोचवून त्यांचा पाठपुरावा करणे आणि प्रश्न सोडविणे, हा ‘सेवा अभियानाचा’ मुख्य उद्देश असल्याचे संतोष साखरे यांनी सांगितले. नागरिकांकडूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘सेवा अभियान’तून कोल्हापुरात २५० नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळाला न्याय
Mumbai
scattered clouds
29
°
C
29
°
29
°
74 %
3.6kmh
35 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
27
°

