• शंभर वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा जागर
• वर्षभर विविध फुटबॉल उपक्रमांचे आयोजन
कोल्हापूर :
फुटबॉलची समृद्ध परंपरा जपणाऱ्या मंगळवार पेठेतील प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या शतकमहोत्सवी वर्षाला सन २०२६-२७च्या फुटबॉल हंगामात प्रारंभ होत आहे. १९२७ साली स्थापन झालेल्या या ऐतिहासिक क्लबच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या खास आकर्षक लोगोचे अनावरण रविवारी (दि. १६) सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष नितीन सावंत व सेक्रेटरी रमेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चंचल देशपांडे, मारूती सावंत, अनिल महाजन उपस्थित होते.
ते म्हणाले की, हा लोगो अनावरण सोहळा ‘शुभंकरोती सांस्कृतिक भवन’, केशवराव बाबा सावंत पार्क, जयप्रभा स्टुडिओजवळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे होणार आहे. लोगोचे अनावरण भारतीय महिला फुटबॉल संघाच्या कोच प्रिया पी.व्ही. (केरळ) यांच्या हस्ते होणार असून, कोल्हापूरच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी विफाच्या महिला फुटबॉल समिती अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे छत्रपती, भागीरथी महिला मंचच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक तसेच भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने गेल्या शंभर वर्षांच्या वाटचालीत राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक दर्जेदार फुटबॉलपटू, प्रशिक्षक आणि पंच घडविले आहेत. या माध्यमातून अनेक खेळाडूंना आपल्या क्रीडा कारकिर्दीला नवी दिशा देण्याचे कार्य क्लबने केले असून, ही परंपरा आजही सातत्याने सुरू आहे. क्लबच्या शंभर वर्षांच्या दैदीप्यमान इतिहासातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, तसेच कोल्हापूरच्या फुटबॉल संस्कृतीला आणखी बळ मिळावे, या उद्देशाने शतकमहोत्सवी वर्षभर विविध फुटबॉलविषयक कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये फुटबॉल स्पर्धा, विविध क्रीडा उपक्रम, माजी खेळाडूंचा सन्मान तसेच फुटबॉल क्षेत्राशी संबंधित विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. या संपूर्ण शतकमहोत्सवी वर्षाचे प्रतिनिधित्व करणारा आकर्षक लोगो यानिमित्ताने सर्वांसमोर आणला जाणार आहे.
कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या या शतकमहोत्सवी वर्षाच्या लोगो अनावरण सोहळ्यास फुटबॉलप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.
——————————
प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या शतकमहोत्सवी वर्षाचा रविवारी लोगो अनावरण सोहळा
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
26.8
°
C
26.8
°
26.8
°
83 %
6.3kmh
97 %
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°

