• आयआयटी मुंबई, टेक्निकलच्या ई-सेलचे मार्गदर्शन
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे येथे आयआयटी मुंबई टेक्निकल कॅम्पसच्या ई-सेलच्या मार्गदर्शनाखाली ‘युरेका! २०२६’ ही आयडिया पिचिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमधील नवोपक्रमशीलता, उद्योजक वृत्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेत विविध विभागांतील ४१ विद्यार्थी संघांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी, तांत्रिक आणि उद्योजकीय संकल्पनांवर आधारित अभिनव कल्पना प्रभावीपणे सादर केल्या. आपल्या कल्पनांची व्यावसायिक क्षमता, सामाजिक परिणाम, अंमलबजावणीची शक्यता आणि भविष्यातील व्यवसाय संधी याबाबत विद्यार्थ्यांनी परीक्षकांसमोर मांडणी केली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून योगेश पाटील, प्रा. विशाल पुंदीकर, आरिफ शेख आणि प्रा. ए. एस. फरास यांनी काम पाहिले. या स्पर्धेत वेदिका अर्जुन मोरे, वैभवी विनायक गुरवाल, सई संजय मुळे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. आदित्य नंदकुमार माने याने द्वितीय तर संकेत मगदूम, हर्ष बाबासो सातपुते, गौरव गजानन चव्हाण, वैष्णव निलेश पाटील यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. एस. आर. पावसकर म्हणाले की, या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनांकडे केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातून न पाहता त्यांचे प्रत्यक्ष व्यवसायाच्या संधींमध्ये रूपांतर करण्याची दिशा मिळाली. ई-सेल समन्वयक प्रा. शोएब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ई-सेल विद्यार्थी अध्यक्ष प्रतीक तुपे यांनी विद्यार्थी समन्वयाची जबाबदारी पार पाडली. प्राची पाटील आणि श्रेया वारंगे यांनी सूत्रसंचालन केले.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. सतीश पावसकर, अधिष्ठाता प्रा. आर. एस. पोवार, असिस्टंट रजिस्ट्रार जितेंद्र पोवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
——————————
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘युरेका २०२६’ आयडिया पिचिंग स्पर्धा उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
78 %
5.1kmh
100 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
29
°

