Homeशैक्षणिक - उद्योग गडहिंग्लज शहरात भागीरथी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेचे उदघाटन

गडहिंग्लज शहरात भागीरथी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेचे उदघाटन

कोल्हापूर :
भागीरथी पतसंस्थेचे मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये रूपांतर झाले आहे. गडहिंग्लज शहरात भागीरथी क्रेडीट सोसायटीचा उदघाटन सोहळा आज पार पडला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नूतन शाखेचे उदघाटन झाले.
भागीरथी संस्थेमुळे आजवर हजारो महिलांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळाली. सौ. अरुंधती महाडिक यांनी महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नमूद केले. क्रेडीट सोसायटीमुळे हजारो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. महिलांना आर्थिक पाठबळ मिळाल्यास कुटुंब आणि समाज अधिक बळकट होईल, असेही ते म्हणाले. भागीरथी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पहिल्या शाखेच्या उदघाटन कार्यक्रमात पालकमंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते.
प्रारंभी चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी भागीरथी संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टं स्पष्ट केली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नूतन सभासदांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या मनोगतातून भागीरथी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. २० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही संस्था आज सुमारे ४० हजार महिलांना जोडणारे मानाचे व्यासपीठ बनली आहे. एका वटवृक्षात रूपांतरित झालेल्या भागीरथी संस्थेने, कला-क्रीडा- शिक्षण-आरोग्य- स्वयंरोजगार अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांना आत्मनिर्भर केले, असे त्यांनी नमूद केले. गडहिंग्लज शहरात भागीरथी संस्थेची शाखा सुरू होणे अभिमानाची बाब आहे. या संस्थेच्या माध्यमातून महिलांना विविध आर्थिक सेवा, कर्जसुविधा आणि मार्गदर्शन केले जाईल, असे खासदार महाडिक म्हणाले.
यावेळी माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, वैष्णवी महाडिक, प्रकाशराव चव्हाण, किसनराव कुराडे, रमेश रिंगणे, बिना कुराडे, राजेंद्र तारळे, प्रितम कापसे, वंदना खोत, सारिका बटकडली, नागेश चौगुले, शिवाज मगर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31 ° C
31 °
30.9 °
70 %
4.6kmh
78 %
Mon
31 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page